खेळ

धक्कादायक : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू 22 तासांपासून कोमात!

नवी दिल्ली l आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.शुक्रवारी अफगाणिस्तानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नजीब ताराकाई याचा गाडीला भीषण अपघात झाले.या भीषण अपघातामुळे 22 तासांपासून तो कोमात आहे.

नजीबची अजूनही काहीच हालचाल होताना दिसत नाही. जलालबाद शहरात गाडीनं त्याचा उडवलं आणि त्यानंतर त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या सलामीवीराची प्रकृती एवढी चिंताजनक आहे की, चाहत्यांना त्याला काबुल किंवा शेजारील देशात उपचारासाठी नेण्यात यावे अशी मागणी चाहते करत आहेत.

29 वर्षीय नजीब यानं एक वन डे आणि 12 ट्वेंटी-20 सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2017मध्ये त्यानं आयर्लंड विरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यांत 90 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात अफगाणिस्ताननं 17 धावांनी आयर्लंडला पराभूत केले होते. 2019मध्ये त्यानं बांगलादेशविरुद्ध ढाका येथे अखेरचा ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

त्यानं 24 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 47.20च्या सरासरीनं 2030 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 6 शतकं आणि 10 अर्धशतकं आहेत. श्पागीजा क्रिकेट लीगमध्ये त्यानं नुकतीच दमदार फटकेबाजी केली होती.

त्यानं नाइटसंघासाठी काबुल इगल्स विरुद्ध 22 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 32 धावा केल्या. त्यानं संपूर्ण कारकिर्दीत 33 ट्वेंटी-20 सामने खेळले आणि त्यात 700 धावा केल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 17 सामन्यांत 553 धावा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button