header ads
Above Article Ad
महाराष्ट्रदेश - विदेश

धक्कादायक : देशात २४ तासांत निघाले एक लाखांहून अधिक रुग्ण,४७८ रुग्णांची मृत्यू…

नवी दिल्ली l सोमवारी सकाळी भारतात करोना संक्रमणाचे १.०३ लाख रुग्ण आढळल्याचं आकडेवारी दर्शवतेय. देशात यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक संख्येची नोंद करण्यात आली होती. या दिवशी देशात एका दिवसात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

देशात यंदाच्या वर्षातच नाही तर करोना संक्रमणा दरम्यान आतापर्यंतच्या आकडेवारीत पहिल्यांदाच करोना संक्रमितांच्या एका दिवसाच्या आकड्यानं लाखांचा टप्पा सहजच पार केलेला दिसतोय. आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी एकाच दिवशी १ लाख ०३ हजार ५५८ संक्रमित रुग्णांची भर पडलीय. या दिवशी ५२ हजार ८४७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रविवारी एकाच दिवशी तब्बल ४७८ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा कहर…

महाराष्ट्रातील ११ हजार १६३ करोना संक्रमित रुग्ण केवळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आढळले आहेत. तर शहरात २५ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय.गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात करोनाचे ५७ हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत तर २२२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रविवारी करोना संक्रमणाचे ५७ हजार ०७४ रुग्ण आढळले. ही एखाद्या राज्याची एका दिवसातील सर्वाधिक संख्या ठरलीय. महाराष्ट्रात आतापर्यंत ३० लाख १० हजार ५९७ जणांना करोना संक्रमणानं गाठलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button