धक्कादायक : डॉक्टरांना धक्का बसला? या तरुणीच्या पोटात निघाला 7 किलो केसांचा गोळा !

बोकारो l देशातील झारखंडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.चक्क तरुणीचं पोट दुखतं म्हणून डाॅक्टरांनी ऑपरेशन केल्यानंतर मोठा खुलाशा झाला आहे.झारखंडमधल्या बोकारो जिल्ह्यात डॉक्टरांनी एक आश्चर्यजनक ऑपरेशन केलं आहे.
पोट दुखते म्हणून दवाखाण्यात आलेल्या तरुणीच्या पोटात काही गोळी असल्याचं चाचणीत कळालं. डॉक्टरांनी आपरेशन केलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. पोटातून 7 किलो केसांचा गोळा निघाला. त्या मुलीला केस खाण्याची सवय होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.एक 17 वर्षांची तरुणी सतत पोट दुखते म्हणू डॉक्टरांकडे आली होती.
डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिच्या पोटात गोळा असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्या तरुणीने खरी माहिती दिली. तिला केस खाण्याची सवय होती. मात्र 5 वर्षांपासून तिने ती सवय बंद केली होती. मात्र नंतर तिचं पोट दुखायला लागलं होतं.सर्व चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन केल्यानंतर पोटात 7 किलो केसांचा गोळा असल्याचं आढळून आलं. त्या गोळ्याने सर्व पोट व्यापलं होतं.
डॉक्टरांनी सर्व केस काढून आतडी स्वच्छ केली. आता तरुणीची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. काही दिवस गेले असते तर पोटात इन्फेक्शन वाढून प्रकरण हाताबाहेर गेलं असतं आणि जीवावर बेतलं असतं डॉक्टरांनी सांगितलं आहे.हे ऑपरेशन 7 तास चाललं. मात्र यशस्वी ठरल्याने तरुणीचा जीव वाचल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.