महाराष्ट्रनाशिक

संप अधिक तीव्र चिघळण्याची शक्यता ! नाशिकमध्ये 142 कर्मचाऱ्यांचे ST महामंडळाकडून निलंबन…

संप अधिक तीव्र चिघळण्याची शक्यता ! नाशिकमध्ये 142 कर्मचाऱ्यांचे ST महामंडळाकडून निलंबन...

नाशिक l मागील चार दिवसापासून परिवहन महामंडळाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

शासकीय सेवेत विलिनीकरण करावे, या मागणीवर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र अजूनही यावर काही तोडगा निघालेला नाही.

लालपरीच्या संपा वरून सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र आणखी वातावरण चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.संपात सहभागी झाल्यावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने नाशिक जिल्ह्यातील ८५ कर्मचाऱ्यांना शुक्रवारी (ता. ११) निलंबित केले.

जिल्ह्यातील निलंबित कर्मचाऱ्यांचा आकडा १४२ पर्यंत पोचला आहे.
संप अधिक तीव्र व चिघळण्याची शक्यता संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने जिल्ह्यातील ५७ कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत निलंबित केले आहे.

शुक्रवारीही जिल्ह्यातील कळवण, पेठ, नांदगाव व मालेगाव तालुक्यांतील आगार वगळता इतर सर्व आगारातील सुमारे ८५ कर्मचारी निलंबित केले. रोज कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या निलंबनामुळे संप अधिक तीव्र व चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

खासगी वाहन थेट बस प्लॅटफॉर्मवर बस संप सुरू असल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांकडून सेवा दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल एजंटांकडून बसस्थानकातील प्रवाशांना बोलावून इच्छितस्थळी सोडले जात आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शुक्रवारी शिवशाही बससेवा शासनाच्या आदेशाने सुरू करण्यात आली. यामुळे नाशिक मध्यवर्ती बसस्थानकात पुण्याकडे जाण्यासाठी शिवशाही बसस्थानकात उभी होती. याचदरम्यान एक खासगी वाहन थेट बसस्थानकात येऊन प्लॅटफॉर्मवर उभे केले.

यातून उतरलेल्या दोघांनी बसस्थानकातच अधिकाऱ्यांसमोर उभे राहून स्थानकातून प्रवाशांची पळवापळवी सुरू केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button