header ads
Above Article Ad
Homeनाशिक

कोविड रूग्णांसाठी त्रिस्तरीय रचनेचा अवलंब काटेकोरपणे करावा : विभागीय आयुक्त राजाराम माने

नाशिक-

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला आवश्यक उपचार उपलब्ध होण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या त्रिस्तरीय रचनेचा अवलंब जिल्हा प्रशासनाने करावा. त्यासाठी सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवून नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
कोविड 19, पाऊस सद्य:स्थिती व पेरणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित विभागातील पाचही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सर्वश्री दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय सह निबंधक डॉ. ज्योती लाठकर आदी उपस्थित होते.

श्री. माने म्हणाले, जिल्ह्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या क्षेत्रात नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या नियंत्रणात येवून रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
विभागातील पर्जन्यमान, पीक कर्ज वाटप व पेरणी याविषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत 94 टक्के पर्जन्य झाले असून 34 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे 91 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात 36% पेरणी झाली असून आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत सरासरी 141 टक्के पाऊस झालेला आहे. निसर्ग वादळामुळे फारसे नुकसान झालेले नाही.

नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 55 टक्के पाऊस झालेला असुन 14 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जळगांव जिल्ह्यात 40 टक्के पेक्षा जास्त पेरण्या झालेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 31.33 टक्के वार्षिक सरासरी पाऊस झाला. नंदुरबार व अहमदनगर जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांत पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे विभागातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यात फारसे नुकसान झाले नसून त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पीककर्ज वाटपाबाबत पाचही जिल्ह्यात नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सर्व जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button