header ads
Above Article Ad
Homeतंत्रज्ञानमहाराष्ट्र

महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल

नवी दिल्ली : 

 शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबईतील कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.

 

मुंबई हायकोर्टाने कोस्टल रोडला दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवली. उच्च न्यायालयाने कोस्टल रोड या मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या पर्यावरण विषयक सर्व परवानग्या रद्द केल्या होत्या. त्याविरोधात महापालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button