आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सुशांतच्या बहिणीवर गुन्हा दाखल

मुंबई l सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी तपास सुरू आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. रियाच्या तक्रारीवरून सुशांतची बहीण प्रियंका सिंह, दिल्लीस्थित राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार आणि अन्य काहीजणांविरोधात भारतीय दंड संहिता आणि एनडीपीसी अॅक्टअंतर्गत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण दिवसेंदिवस नवीन वळण घेत आहे. सोमवारी (7 सप्टेंबर) रात्री मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बहिणीविरुद्ध एफआयआर नोंदवला.सुशांत सिंहची बहिण प्रियंका सिंह यांच्यावर अबेटमेंट ऑफ सुसाइड म्हणजेच आत्महत्येला प्रवृत्त केल्यासंदर्भात FIR दाखल करण्यात आल्याचं NDTV ने सांगितलं आहे.

आत्महत्येसाठी सुशांतला प्रवृत्त करणं, विश्वासघात करणं आणि कट रचणे हे आरोप प्रियंका यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

रियाची तक्रार

सोमवारी (7 सप्टेंबर) रिया चक्रवर्तीने वांद्रे पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली होती. खोटं प्रिस्क्रिप्शन देणं आणि टेलिमेडिसीन नियमावलीचं उल्लंघन याकरता प्रियंका आणि डॉक्टर तरुण कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती.

8 जूनला सुशांतने बहिणीसोबतचे चॅट्स मला दाखवले होते, असं रियाने सांगितलं. बहिणीने सुशांतला काही औषधं घ्यायला सांगितली.

“डॉक्टरांनी सांगितलेलीच औषधं तू घ्यायाला हवीस,” असं सुशांतला आपण सांगितलं होतं असं रियाने सांगितलं. “बहिणीने सांगितलंय म्हणून औषधं घेऊ नकोस, कारण त्यांच्याकडे मेडिकल डिग्री नाही,” असं रियाने सुशांतला सांगितलं.

प्रियंका यांनी डॉ. तरुण कुमार यांच्याकडून खोटं प्रिस्क्रिप्शन बनवून घेतल्याचा दावा रिया यांनी केला. या गोष्टीवरून माझ्या आणि सुशांतमध्ये मतभेद झाले होते, असंही रियाने सांगितलं.

“सुशांतने मला घरातून निघून जायला सांगितलं, कारण त्याची दुसरी बहीण मीतू सिंह तिथे राहायला येणार होती.”

या संपूर्ण प्रकरणात रियाच्या भूमिकेविषयी संदिग्धता आहे आणि सीबीआय याप्रकरणाची चौकशी करत आहे.

सीबीआयव्यतिरिक्त नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणात ड्रग्सची खरेदी, ड्रग्सचं सेवन, देवाणघेवाण यासंदर्भात तपास करत आहे.

एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या सॅम्युअल मिरांडसह आतापर्यंत नऊजणांना अटक केली आहे.

एनसीबीने रियाची अनेकदा चौकशी केली आहे. मंगळवारीही तिची चौकशी सुरूच राहील. सैजन्य – BBC marathi

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button