ट्रेंडिंग न्यूजतंत्रज्ञानदेश - विदेशमहाराष्ट्रमुंबई

पेट्रोल भरून वैतागले आहात का? “या” मायलेजवाल्या स्कूटर खरेदी करा

पेट्रोल भरून वैतागले आहात का? "या" मायलेजवाल्या 5 स्कूटर खरेदी करा

मुंबई l भारतात दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे किमती वाढतच आहे. यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

बाजारात दमदार मायलेज असलेल्या अनेक बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत, पण स्कूटरच्या बाबतीत हे प्रकरण थोडे वेगळे आहे. भारतातील सर्वात जास्त मायलेज असलेली स्कूटी कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला अशा 5 स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या मायलेजमध्ये चांगल्या आहेत आणि किंमतही जास्त नाही.

Suzuki Access 125,
Yamaha Fascino 125 FI
Hero Pleasure Plus

वाढत्या पेट्रोलच्या किमती मुळे सध्या बाईक वापरणारे परवडणारे नाही. १ लिटर पेट्रोल मध्ये ७० ते ८० किमी चा टप्पा पार पडत नाही.

Yamaha Fascino 125 FI

यामाहा Fascino 125 FI ची किंमत भारतात 72,030 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या स्कूटरचं डिझाईन जास्त चांगलं आहे, त्यामुळे या स्कूटरबद्दल तरुणांमध्ये क्रेझ आहे. यामाहा Fascino 125 एफआय स्कूटीने 125 सीसी सेगमेंटमध्ये चांगल्या मायलेजसाठी आपली ओळख निर्माण केली आहे. कंपनीच्या मते, ही स्कूटर 63 किमी / लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

Suzuki Access 125

Suzuki Access 125 ची सुरुवातीची किंमत जवळपास 73,267 हजार रुपये इतकी आहे. ही स्कूटर चार व्हेरिएंट आणि 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. 125cc इंजिन असलेली ही जबरदस्त मायलेजवाली स्कूटी आहे. ही स्कूटी एक लीटर पेट्रोलमध्ये 64 किमी पर्यंत धावू शकते असा कंपनीचा दावा आहे.

Hero Pleasure Plus

जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पची Pleasure Plus स्कूटर 63 किमी / लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे. ही स्कूटर तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरमध्ये 110.9 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 8.1 पीएस पॉवर आणि 8.7 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत या स्कूटरची सुरुवातीची किंमत 58,900 हजार रुपये इतकी आहे.

Honda Dio

मायलेजच्या शर्यतीत तुम्ही Honda Dio ही स्कूटर विसरू शकत नाही. ही स्कूटर सुमारे 55 kmpl चे मायलेज देण्यास सक्षम आहे. कंपनीने अलीकडेच ती एका नवीन लूकसह लॉन्च केली आहे. 110 सीसी इंजिन असलेल्या होंडा Dio ची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 63,273 रुपये आहे. याशिवाय, होंडा अॅक्टिव्हा 109.5 सीसी इंजिन असलेली स्कूटर आहे, जी 60 किमी/लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे

TVS Scooty Pep Plus

टीव्हीएसची ही स्कूटर मायलेजमध्ये चांगली आहे, तसेच ग्राहकांच्या खिशासाठी फार जड नाही. कंपनी टीव्हीएस स्कूटी पेप प्लसमध्ये 65 किमी प्रति लीटर मायलेज असल्याचा दावा करते. यात 87.8cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे 5.4 PS ची शक्ती आणि 6.5 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. भारतीय बाजारात या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 56,009 हजार रुपये इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button