header ads
Above Article Ad
मनोरंजन

”हा” गुपचूप पुरवायचा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना ड्रग्स!

मुंबई l मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 ने हिंदी चित्रपट सृष्टीतील काही जणांना अंमली पदार्थ पुरवत असलेल्या दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 139 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एम डी जप्त केले आहे.सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर तपासात हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार हे अमली पदार्थ सेवन करत असल्याचं चौकशीत समोर आलं आहे.

याच बाजारमूल्य साडेपाच लाख रुपये आहे. उस्मान अन्वर अली शेख (वय 40) असं आरोपीचं नाव असून तो जोगेश्वरी पश्चिम येथे राहतो. अंमली पदार्थ विकण्याचा याचा धंदा आहे.चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार अंमली पदार्थ सेवन करत असल्यावरून देशभरात चर्चा सुरू आहे आणि त्यांची चौकशी होत आहे.

त्यांनाही हा उस्मान शेख अंमली पदार्थ पुरवत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आल्याची माहिती गुन्हे शाखा विभागाचे पोलीस आयुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.उस्मान हा झोमॅटो ही हॉटेल मधील खाद्यपदार्थ घरपोच पुरवणाऱ्या कंपनीत काम करतो आणि त्याच्या आडून ग्राहकांना अमली पदार्थ पुरवत होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 9 च्या पोलिसांना आपल्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीच्या ओशिवरा या ठिकाणी असलेल्या एका मॉल जवळ उस्मान हा मेफेड्रोन म्हणजेच एम डी हा अमली पदार्थ विकण्यासाठी मोटारसायकल घेऊन येत असल्याची माहिती मिळाली त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी उस्मान अन्वर अली शेख याला रंगेहात पकडले.त्याच्याकडे 139 ग्राम इतक्या वजनाचे एमडी आढळले. ज्याची बाजारातील किमंत साडे पाच लाख रुपये आहे. उस्मानला आपल्या कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याला आबु सुफुया खान हा एम डी पुरवत असल्याचं सांगितलं. तसंच तो चित्रपट सृष्टीतील काही व्यक्तींनाही अमली पदार्थ पुरवत असल्याचे चौकशीत सांगितले.

त्यामुळे या दोघांची याबाबत त्या दिशेने चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button