खेळ

व्हिडीओ : अखेर धोनीने स्टेडियम बाहेर मारलेला चेंडू कोणाला सापडला?

शारजाह। इंडियन प्रीमिअर लीगमध्ये काल(२२ सप्टेंबर) १३ व्या मोसमातील चौथा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात राजस्थानने १६ धावांनी चेन्नईवर मात करत या मोसमातील पहिला विजय मिळवला.

यावेळी शारजाहचे स्टेडियम लहान असल्याने प्रत्येकाने बॅटीवर चांगलाच हात आजमावला. या पूर्ण सामन्यात 33 षटकार लगावले गेले. राजस्थान रॉयल्सकडून ( RR) 17, तर चेन्नई सुपर किंग्सकडून ( CSK) 16 षटकार लगावले गेले.

या सामन्यात एमएस धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी या सामन्यादरम्यान धोनीने मारलेल्या एका षटकाराची जोरदार चर्चा झाली. धोनीने मारलेल्या ३ षटकारांपैकी १ षटकाराचा चेंडू थेट स्टेडियमपार करुन रस्त्यावर प़डला.

या सामन्यात राजस्थानने चेन्नईसमोर २१७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना २० व्या षटकात चेन्नईला ३८ धावांची गरज होती.

त्या पार करणे चेन्नईसाठी जवळपास अशक्य होते. परंतु त्याच षटकाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर धोनीने ३ षटकार ठोकत पराभवाचे अंतर कमी केले. हे षटक टॉम करन टाकत होता.धोनीने हे तीन्ही षटकार लांब मारले होते. त्यातील चौथ्या चेंडूवर मारलेला षटकार तब्बल ९२ मीटरचा होता. हा षटकार धोनी लाँग-ऑनच्या दिशेने मारला.

पण त्या षटकाराचा चेंडू स्टेडियमच्या बाहेर रस्त्यावर जाऊन पडला. त्यावेळी तेथील एका चाहत्याला तो चेंडू मिळाला. धोनीने मारलेला हा चेंडू मिळाल्याने तो लकी चाहता भलताच खुश दिसत होता. धोनीच्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.धोनीने या सामन्यात १७ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने सर्वाधिक ७२ धावा केल्या.

ही खेळी त्याने ३७ चेंडूत १ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने केली. पण त्याची ही खेळी चेन्नईला विजय मिळवून देऊ शकली नाही.तत्पूर्वी राजस्थानकडून संजू सॅमसनने ३२ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. तर कर्णधार स्टिव्ह स्मिथने ४७ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरने तुफानी फलंदाजी केली. त्याने ८ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१६ धावा केल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

Thanks for a whole 𝓼𝓬𝓸𝓸𝓹 of entertainment, Smudgy! 😄 #HallaBol #RRvCSK #RoyalsFamily #IPL2020

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals) on

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button