header ads
Above Article Ad
देश - विदेश

देशात किती टक्के रुग्ण ऑक्सिजनवर? वाचा सविस्तर…

दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 12,71,00,000 हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही 1.18 टक्के इतका कमी झाला आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे.

सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर 4.29 टक्के रुग्ण होते. ते आता 4.03 टक्के इतके आहेत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. गेल्या वर्षी होम आयसोलेशनमध्ये 80 टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. यावर्षी कोरोना रुग्णांच्या उपचारात आपली सुरुवात चांगली आहे.


दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर 1.93 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन 1.75 टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर 0.40 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे.

रुग्णालयामध्ये मनुष्यबळ वाढवण्यावरही आपण काम करत आहोत. एम्समध्ये अनेक असे डॉक्टर्स आहेत जे दुसऱ्या विभागांमध्ये काम करत आहेत. अनेक नर्सेस आहेत ज्यांनी गेल्या वर्षी करोनात थेट काम केले नाही. पण आता आपण मनुष्यबळ वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाच्या उपचारासाठी सक्षम बनवत आहोत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button