ट्रेंडिंग न्यूजदेश - विदेश

शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होणार का ? काय म्हणाले राकेश झुनझुनवाला…

शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होणार का ? काय म्हणाले राकेश झुनझुनवाला...

मुंबई l शेअर बाजारात कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदविला असल्याने बाजारात तेजी दिसत आहे.आज BANKNIFTY ३८२०० वरती जातांना दिसत आहे.तर NIFTY 50 18000 जवळ प्रोग्रेस करत आहे. शेअर बाजारातील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजाराबाबत आपले विचार मांडले आहेत. तसेच सध्याच्या परिस्थितीत शेअर बाजारात गुंतवणूक करणारे छोटे किंवा मोठे गुंतवणूकदार कोणाचेही म्हणणे एकून घेत नाहीत. ते आपल्या मनानुसार कोणताही अभ्यास न करता, ठोकताळे न बांधता गुंतवणूक करतात.

त्यामुळे त्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो किंवा अपेक्षाएवढा फायदा होत नाही. देशाचा शेअर बाजार मोठ्या बदलातून जात असल्याचे मत झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

राकेश झुनझुनवाला काय म्हणाले ?

शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत तुम्ही काय सल्ला द्याल, असे विचारले असता, शेअर बाजारात कोणी कोणाचा सल्ला मानत नाही. छोटे किंवा मोठे गुंतवणूकदार मनाप्रमाणे अभ्यास न करता व्यवहार करतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जून 2020 मध्ये आपण गुंतवणूकदारांना आता शेअर विकत घ्या, असा सल्ला देत होतो. मात्र, आपला सल्ला कोणीही ऐकला नाही. आपले म्हणणे एकले असते तर आज त्यांना मोठा फायदा झाला असता, असे झुनझुनवाला यांनी सांगितले.

एका गुंतवणूकदाराला आपण शेअर विकत घ्या, असा सल्ला दिला होता. त्यावेळी त्यांनी आपल्याला या वेळीच का असे विचारले. या का चे उत्तर आपण देऊ शकत नाही. काही ठोकताळे आणि बाजाराची दिशा लक्षात घेत गुंतवणूक करणे गरजेचे असते. तुम्ही घसा फोडून गुंतवणूकदारांना सल्ला द्या, तुमचे म्हणणे कोणीही ऐकत नाही.

आपला सल्ला ऐकून कोरोनाच्या पहिल्या लाटेत गुंतवणूकदारांनी आपण सांगितलेल्या शेअरमध्ये गुतंवणूक केली असती, तर त्यांना आता चांगला फायदा झाला असता, असे ते म्हणाले.

शेअर बाजारात मोठी घसरण होणार आहे काय ? (Will there be a big drop in the stock market? What did Rakesh Jhunjhunwala say …)

असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, शेअर बाजार सध्या मोठ्या बदलातून जात आहे. मात्र, आपण बाजाराबाबत सकारात्मक आणि बुलीश आहोत, असे त्यांनी सांगितले. बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे. बाजारात थोडीशी घसरण झाली तर ती गुतंवणूकीसाठी चांगली संधी असेल,असे त्यांनी सांगितले.

शेअर बाजाराच्या तेजीमागे अर्थव्यवस्थेची वाढ आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीचा विचार करूनच गुतंवणूक करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. बाजारात काही काळ करेक्शन येण्याची शक्यता आहे. कोरोना म्हणजे फ्लू आहे. तो कॅन्सर नाही, असे झुमझुनवाला यांनी स्पष्ट करत गुंतवणूकदारांनी घसरणीला घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले.

बाजारात घसरण कायमस्वरुपी नसते. त्यामुळे घसरण ही गुतंवणुकीची चांगली संधी असते. त्यामुळे घसरणीला घाबरण्याची गरज नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाजार घसरून साडेसात हजार अकांपर्यंत पोहचला होता. तो आता साडेसतरा हजारापर्यंत पोहचला आहे. आता बाजार घसरला तरी 16 हजार अंकांच्या खाली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. याला घसरण न समजता त्याला करेक्शन म्हणावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button