header ads
Above Article Ad
महाराष्ट्र

नाशिक कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील युसूफ मेमनचा मृत्यू

नाशिकः

युसूफ मेमन नाशिक रोड कारागृहात १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी युसूफ मेमनला हृदयविकाराचा झटका आला.

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी युसूफ मेमनचा आज (ता.२६) नाशिक मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. याकूब मेमन आणि टायगर मेमनचा युसूफ भाऊ असून हे मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. यूसूफचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याची माहिती समोर येत आहे.

त्याला सिव्हील हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सकाळी ११ वाजता मेमनचा मुत्यू झाल्याची माहिती कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button